Students who have registered online for the said admission process and have locked Part 1 of the admission application but Part 2 is yet to be filled or locked, such students will be provided with the facility to fill Part 2 of their application from 12:15 PM on June 6, 2025 to 12:30 PM on June 7, 2025. However, the concerned students should lock their preference order in Part 2 of the application within the given time. Students who have locked Part 2 earlier will not get the facility to change their preference order during this period.Students who have not registered for online admission by 05th June 2025 or have not filled their admission form Part 1 or have filled the admission form partially and could not complete their application Part 1 within the prescribed time limit, the facility to fill Part 1 and Part 2 of the admission form afresh will be available at the beginning of each round for all such students. Therefore, such students need not worry. They should fill and lock their applications in time for the next round. New students will also get the facility to fill their applications before each round. For this, care should be taken to strictly follow the schedule of the admission round.
ज्या विद्यार्थ्यांनी सदर प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग १ लॉक केला आहे तथापि भाग २ अद्याप भरणे बाकी आहे, किंवा लॉक करणे बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी दिनांक ६ जून २०२५ रोजी दुपारी १२:१५ ते ७ जून २०२५ दुपारी १२:३० वा या कालावधीत आपल्या अर्जाचा भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपला पसंतीक्रम अर्ज भाग २ दिलेल्या वेळेत लॉक करावा. यापूर्वी भाग दोन लॉक केलेल्या विद्यार्थ्यांना आपले पसंती क्रम बदलण्याचे सुविधा यादरम्यान मिळणार नाही.ज्या विद्यार्थ्यांनी दि. ०५ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही किंवा आपला प्रवेश अर्ज भाग १ भरलेला नाही अथवा प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे व विहित मुदतीत आपला अर्जाचा भाग १ पूर्ण करू शकले नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करावेत. प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे. यासाठी प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याची दक्षता घ्यावी.
Read Less